Sale!

Flaxseed Oil 1 Ltr (Organic Cold Pressed Javas Oil ) / फ्लॅक्ससीड तेल (ऑरगॅनिक कोल्ड प्रेसड जावास ऑइल 1 Ltr )

700.00 650.00

Description

जवसचे 7 मोठे फायदे तुम्हाला माहित असावे

जवसचे अनेक औषधी फायदे

जवसचे 7 मोठे फायदे तुम्हाला माहित असावे
 जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्‍य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

 

1. दाह कमी करते – लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.

2. हिरड्या आणि दात मजबूत करते – हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.

3. कफ बाहेर काढणे –  जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.

4. पाठदुखी – पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.

5. भाजलेल्या जागी बांधावे – एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.

6. पचन क्रिया सुधरते – आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.

7. इतर फायदे – रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Flaxseed Oil 1 Ltr (Organic Cold Pressed Javas Oil ) / फ्लॅक्ससीड तेल (ऑरगॅनिक कोल्ड प्रेसड जावास ऑइल 1 Ltr )”

Your email address will not be published. Required fields are marked *